Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आकाशवाणी चौकात कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील आकाशवाणी चौकात कारच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चालकाविरूध्द जिल्हापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे.

सविस्तर माहिती अशी की, जळगाव शहरातील महाबळ कॉलनीतील सुरेश नगर येथील रहिवासी रोहित बाळासाहेब पाटील वय वर्ष ४७ हे शुक्रवारी त्यांच्या दुचाकीने आकाशवाणी चौकातून जात होते. यादरम्यान चौकातील दत्त मंदिरासमोर एम.एच १४ पी.सी. १४३३ या क्रमांकाच्या चारचाकीने दुचाकीला धडक दिली. यात रोहित पाटील यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी रोहित पाटील यांच्या जबाबावरुन जिल्हापेठ पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे करीत आहेत

Exit mobile version