Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ममुराबाद गावाजवळ मालवाहूच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील ममुराबाद गावाजवळील रसवंतीजवळ भरधाव मालवाहू रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय धुडकू पाटील (वय-५१) रा. आडगाव ता. यावल हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून फुल विक्रीचा व्यवसाय करतात. मंगळवारी २१ जून रोजी सकाळी ६.३० वाजता कामाच्या निमित्ताने ते दुचाकीने जळगावात येत असतांना तालुक्यातील ममुराबाद गावाजवळील रसवंतीजवळून जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणारे मालवाहू रिक्षा (एमएच १९ बीएम ०१७४) ने जोरदार धडक दिली. या अपघातात संजय पाटील हे जखमी झाले तर दुचाकीचेही नुकसान झाले आहे. याबाबत सायंकाळी ६ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून त्यांनी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मालवाहू रिक्षा चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बापू कोळी करीत आहे.

Exit mobile version