Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाडळसा गावाजवळ दुचाकीची कारला धडक; फैजपूर पोलीसात गुन्हा दाखल

फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । पाडळसा ते भुसावळ रोड दरम्यान कारची दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला असून कारचे मोठे नुकसान झाल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, तुळशीराम धोंडू पाटील (वय-६५) रा. एसएमआयटी नगर जळगाव हे आपल्या कार क्रमांक (एमएच १९ बीयू ४८७८) ने २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास भुसावळकडून फैजपूर मार्गे रावेर येथे जात असतांना पाडळसा ते भुसावळ दरम्यान समोरू येणारी दुचाकी क्रमांक (एमपी ६८ एमजी ९८०५) ने जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला तर दुचाकीसह कारचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी तुळशीराम पाटील यांच्या फिर्यादीवरून फैजपूर पोलीस ठाण्यात  (एमपी ६८ एमजी ९८०५) क्रमांकाच्या अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेश वंजारी करीत आहे.

Exit mobile version