Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन दुचाकींची समोरासमोर धडक ; एक ठार

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पाचोरा ते मोंढाळा रस्त्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत सुत्रांकडून मिळेलेल्या माहितीनुसार, पाचोरा ते मोंढाळा रस्त्यावरील म्हसोबा बाबा मंदिराजवळ दि.१९ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास एम.एच.१९-डी.ई.३२९६ व एम.एच.२१ – ए.ए.२५३९ या दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन या अपघात सातगाव (डोंगरी) ता.पाचोरा येथील सागर विजय परदेशी (वय-२८)याचा जागीच मृत्यू झाला असून यमराज धर्मराज पाटील, गणेश भीमराव पाटील व गोपाल हारसिंग पाटील हे अंतुर्ली येथील तीघ गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. ही धडक इतकी जोरदार होती की, या अपघातातील दोन्ही दुचाकांचा खुर्दा झालेला आहे.या अपघाताबाबत पुढील तपास पाचोरा पोलीस करत आहेत.

 

Exit mobile version