दोन दुचाकींची समोरासमोर धडक; तालुका पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणे रोडने घरी जाणाऱ्या मामा भाचाच्या दुचाकीला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने दोघे जखमी झाल्याची घटना १८ जुलै रोजी रात्री ७.३० वाजता घडली. याप्रकरणी सोमवारी दुपारी १ वाजता तालुका पोलीसात अज्ञात दुचाकीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, सैय्यद जाकीर सैय्यक रज्जाक (वय-५०) रा. आव्हाणा ता.जि.जळगाव हे त्याचा भाचा शेख मुस्तफा शेख अकबर रा. आव्हाणा याच्यासोबत रविवारी १८ जुलै रोजी कामाच्या निमित्ताने दुचाकीने आले होते. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास काम आटोपून मामा भाचे दोघे एकाच दुचाकीने आव्हाणे येथे जाण्यासाठी निघाले. दरम्यान आव्हाणेकडून भरधाव वेगाने (एमएच १९ डीएम ६७७८) येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. यात दोघेजण गंभीर जखमी झाले. दोघांवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी सैय्यद जाकीर यांनी सोमवारी दुपारी १ वाजता तालुका पोलीसात अज्ञात दुचाकीचालकाविरोधात तक्रार दिली. सैय्यद जाकीर यांच्या तक्रारीवरून तालुका पोलीसात अज्ञात दुचाकीधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुशिल पाटील करीत आहे. 

Protected Content