Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विनापरवाना लाकूड वाहतूक करणारे दोन ट्रक पकडले; वनविभागाची कारवाई

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  यावल तालुक्यातील पश्चिम व पुर्व वनविभागाने गुप्त माहितीच्या आधारावर केलेल्या संयुक्त कारवाईत सुमारे १२ लाख रूपये किमतीच्या वाहनुक मोटरसह सुमारे ३० हजार रूपये किमतीचे लाकुड जप्त केलेले आहे.

 

या संदर्भात वनविभागाच्या सुत्रांकडुन मिळालेल्या माहिती अनुसार सोमवार १४ ऑगस्ट सोमवार रोजी दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान  उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव यांचे कडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून यावल ते किनगाव रस्त्याने गस्त करीत असलेल्या वन विभागाच्या पथकास चुंचाळे गावाजवळ संशयितरित्या जात असलेल्या वाहन क्रमांक.(एमएच २८ बी ८५४३) याचा अटकाव करून वाहनाची तपासणी केली असता अवैधरित्या विनापरवाना लाकूड तसेच यावल ते हरिपुरा रस्त्याने गस्त करित असताना वाहन क्रमांक एच आर-४७बी ०६७२ वाहनात अवैध् लाकूड भरलेले आढळुन आले.

 

गस्तीवर असलेल्या वन विभागाच्या पथकाने चौकशी केले असता सदरच्या वाहन चालका कडे लाकूड वाहतूक परवाना मिळून आला नाही. प्रथथदर्शनी वनगुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्याने मुद्देमालासह वाहन पुढील चौकशी साठी ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी चालक जियाफत अली नजाफत अली रा. सुरत गुजरात आणि जब्बार बेग सत्तार बेग राहणार बुऱ्हानपूर,(मध्यप्रदेश ) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यांनी केली कारवाई

सदर कार्यवाही ही ऋषिकेश रंजन  वनसंरक्षक धुळे, जमीर शेख उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव,  प्रथमेश हाडपे सहाय्यक वन संरक्षक प्रादेशिक व कॅम्पा यावल, यांचे मार्गदर्शनाखाली  वनक्षेत्रपाल यावल पश्चिम क्षेत्र सुनिल भिलावे, वनक्षेत्रपाल यावल पुर्व, वनपाल अजय बावणे, अतुल तायडे, रवींद्र तायडे यांनी ही कारवाई केली आहे.

Exit mobile version