Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बांदीपोरा चकमकीत दोन दहशतवादी ठार

श्रीनगर वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया सुरूच असून येथील बांदीपोरा भागात आज पहाटे झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शिवाय, घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा व स्फोटकचे साहित्य देखील जप्त करण्यात जवानांना यश आले आहे.

श्रीनगरपासून ५५ किलोमीटर अंतरावर असलेल्या लादारा गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. यानंतर कारवाई करत सुरक्षा दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं. यावेळी दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. जवानांनी या चकमकीत रविवारी एका दहशतवाद्याला ठार केलं होतं. त्यानंतर आज सकाळी पुन्हा चकमक झाली. या चकमकीत दुसरा दहशतवादी ठार झाला. आता सुरक्षा दलाच्या जवानांकडून परिसरात शोध मोहीम हाती घेण्यात आलीय. तसंच ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे.

Exit mobile version