Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जम्मू-काश्मिरमध्ये दोन दहशतवादी ठार

श्रीनगर वृत्तसंस्था । जम्मू-काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यात आज भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाले असून अद्याप ही चकमक सुरू असल्याचे वृत्त आहे.

शोपिया जिल्ह्यातील सुगन झैनापोरा भागात जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. या परिसरात दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर जवानांच्या पथकाने संपूर्ण परिसरा वेढा दिला. जवानांची चाहूल लागताच दडून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला व चकमकीस सुरूवात झाली.

अलीकडेच दक्षिण काश्मीरमधील पंपोर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले होते. तर तीन जवान जखमी झाले होते. यानंतर जवानांनी परिसरात शोध मोहिम सुरू केली असून यातून ही चकमक सुरू झाली आहे.

Exit mobile version