Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चकमकीत दोन दहशतवादी ठार; परिसरात शोध मोहिम

श्रीनगर वृत्तसंस्था । जम्मू- काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये रात्री उशीरा झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून या भागात अजून काही अतिरेकी दडून बसल्याची शक्यता आहे.

कुलगाम परिसरात सुरक्षा जवान व दहशतवाद्यांत चकमक झाली. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. राज्य पोलिस, राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले होते. यातच चिंगाम भागात चकमक झाली. या भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले. या दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.

ज्या ठिकाणी चकमक झाली तो परिसर रिकामा करण्यात आला असून परिसरात शोध मोहिम सुरू करण्यात आलेली आहे.

Exit mobile version