Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत दोन शिक्षकांचा आत्महत्येचा प्रयत्न

net3 1568812930

 

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील ३०० दिव्यांग शाळांना अनुदान देण्याच्या मागणीसाठी मंत्रालयात आलेल्या दोन शिक्षकांनी आज दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्याने प्रचंड खळबळ उडाली.दरम्यान, दोघेही शिक्षक सुरक्षा जाळीत पडल्याने मोठा अनर्थ टळला.

 

दिव्यांग शाळांना अनुदान देण्याच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने सरकारचा निषेध करत हेमंत पाटील आणि अरुण नेतोरे या दोघंही शिक्षकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. दरम्यान, दुसऱ्या मजल्याजवळच सुरक्षेसाठी जाळी लावण्यात आली असून त्या जाळीत दोघेही अडकले. या दोघांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. नंतर दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेमुळे मंत्रालय परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

Exit mobile version