Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शिंदे यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे दोन आमदार परतले

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसंस्था | एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे दोन आमदार राज्यात परतले असून यातील एकाने आपल्या सोबत घातपाताचा प्रयत्न झाल्याची माहिती दिली आहे.

 

एकनाथ शिंदे यांनी आता जवळपास संपूर्ण शिवसेना आपल्या सोबत घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तथापि, अजूनही काही आमदार तेथून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. यात नागपूर येथील आमदार नितीन देशमुख आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील कैलास पाटील हे दोन आमदार राज्यात पुन्हा परतले आहेत.

 

यातील नितीन देशमुख यांनी आपल्याला मारहाण करण्यात आली असून घातपाताचा प्रयत्न झाल्याचा दावा केला आहे. आपल्याला हार्ट अटॅक आला नव्हता तर आपल्याला अज्ञात इंजेक्शन देण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. तर खासदार संजय राऊत यांनी अजून काही आमदार राज्यात परतणार असल्याची माहिती दिली आहे.

 

Exit mobile version