Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे गंभीर दुखापत झाल्याची घटना अंकलेश्वर महामार्गावर घडली. याबाबत रावेर पोलीसात ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

 

बऱ्हाणपुर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर कर्जेत गावाजवळून रावेरकडे जात असलेल्या  दुचाकी (एमएच १९ एए ६२४) ला भरधाव ट्रक (टीएन २८ एएच ७९४२) ने जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील संजय किशोन राठोड (वय-२२) रा. खरवा ता. झिरण्या खरगाने ह. मु. केऱ्हाळा ता. रावेर आणि ज्ञानेश्वर दरबार पवार (वय-२२) रा. आभोडा खुर्द ता. रावेर हे दोघे गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने रावेर ग्रामीण रूग्णालयात उपारार्थ दाखल करण्यात आले आहे. संजय राठोड यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालक याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक नितीन डांबरे करीत आहे.

Exit mobile version