Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

१५ लाख रूपयांची लूट करणाऱ्या दोघा भामट्यांना चारदिवस पोलिस कोठडी

जळगाव  प्रतिनिधी । पंचमुखी हनुमान मंदिराजवळ दुचाकीवरून १५ लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्या दोघांना पिस्तुलाचा धाक दाखवत रोकड घेऊन फरारी होणाऱ्या दोन्ही गुन्हेगारांना पोलिसांनी उल्हासनगरातून अटक करुन आणले. आज न्यायालयात हजर केले असतां त्यांना चार दिवस पोलिस कोठडीत रवाना करण्यात आले आहे. उर्वरीत रकमेचा अद्याप दोघांनी हिशेब दिला नसुन उडवा उडवीची उत्तरे देत आहेत. 

प्रभा पॉलीमर कंपनीचे महेश भावसार (वय ५३) आणि संजय विभांडिक (५१) असे १ मार्चला दुपारी आर. कांतिलाल जोशी पेठ मटण मार्केटसमोर या हवाला ट्रेडर्सकडून १५ लाख रुपये घेत गणपतीनगरकडे जात होते. पद्मावती मंगल कार्यालयासमोरच अज्ञात लुटारूंनी विनानंबरच्या दुचाकीने भावसार यांना खाली पाडून झटापट करुन पिस्तूल रोखत रोकड लांबविली होती. या प्रकरणात घटनास्थळावरच अप्पर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी तपासाची सुत्रे हाती घेतली. तर, कुमार चिंता यांनी वेगवळ्या पथकाना रवाना केले.तासाभरात संशयीत निष्पन्न झाले मात्र, त्यांनी जळगाव धुळे, सुरत, भिवंडी, उल्हास नगर असे पेालिसांना पळवले. अखेर खुशाल मोळक व विकी ऊर्फ रितीक राणा (दोन्ही रा. मोहाडी ता. जि. धुळे) यांना अटक करुन आज न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने ४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. संशयीतांकडून पोलिस पथकाने साडेनऊ लाख रुपये जप्त केले असून उर्वरीत साडेपाच लाखांचा अद्याप हिशेब त्यांनी दिला नसुन उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने कोठडीत खातरपाणी झाल्यावर हिशेबाचा ताळमेळ बसणार असल्याचे एमआयडीसी पेालिसांनी सांगीतले.

Exit mobile version