Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील रोहिणी गावाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत वृत्त असे की, नांदगाव ते चाळीसगाव रोडावरील रोहिणी गावाजवळील शिव नाल्याच्या पुलाजवळ अज्ञात वाहन धारकाने बजाज कंपनीच्या दुचाकीला (क्र. एम.एच.०३ ए.सी. ७५०६) जोरदार धडक दिला. या अपघातात किरण भिकन मोरे (वय-२२ रा. देवारी कनाशी ता. भडगाव) व विजय अशोक मोरे ( वय-२२ रा. बोदडे ता. भडगाव) हे दोघेही जागीच ठार झाल्याची घटना २३ ऑगस्ट रोजी रात्री १०:३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहेत. घटना घडताच अज्ञात वाहन धारक हा पसार झाला आहेत. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहेत. मयत किरण भिकन मोरे यांचे वडील भिकन विश्राम मोरे यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम-३०४ (अ), २७९, ३३७, ३३८, ४२७, १८४, १३४ (बी) अशा विविध कलमान्वये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास भालचंद्र पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version