Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरापासून जवळ असलेल्या तरसोद फाट्याजवळ डंपरवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांच्यावर वाळूमाफियांनी लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळगवारी ६ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडला होता. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात दोन जणांना अटक करण्यात आली होती. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गौतम यशवंत पानपाटील वय ३८ रा. सावखेडा ता.जि.जळगाव आणि विठ्ठल भगवान पाटील वय-३६ रा. ज्ञानदेव नगर, जळगाव असे संशयित आरोपींची नावे आहेत.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार आणि तहसीलदार बनसोडे हे मंगळवारी ६ फेब्रुवारी रोजी भुसावळच्या दिशेने शासकीय कार्यक्रमाला जागा पाहण्यासाठी गेले होते. तेथून परत येत असतांना रात्री ११.३० वाजेच्या सुमारास त्यांना राष्ट्रीय महामार्गावरील तरसोद फाट्यानजीकच्या महेंद्रा शोरूमच्या जवळ वाळूचे डंपर दिसले. त्यांनी तहसीलदार विजय बनसोडे यांना या डंपरवर कारवाई करण्याचे सांगितले. यानुसार कारवाई सुरू असतांनाच दुसरे डंपर आले. तर, थोड्याच वेळात दुचाकी व चारचाकीतून विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा नामदेव सपकाळे, गौतम यशवंत पानपाटील रा. ज्ञानदेव नगर, जळगाव, विठ्ठल भगवान पाटील रा. ज्ञानदेव नगर, जळगाव, आकाश युवराज सपकाळे, योगेश उर्फ रितीक दिगंबर कोल्हे, अमोल छगन कोळी, संदीप ठाकूर, शिवकुमार इंगळे आणि अक्षय नामदेव सपकाळे सर्व रा. जळगाव यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार व तहसीलदार विजय बनसोडे यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढविला. यात सोपान कासार हे जखमी झाले असून त्यांच्या शासकीय वाहनाचे देखील नुकसान झाले आहे. जखमी अवस्थेत निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांना तातडीने मध्यरात्री शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल उर्फ विक्की उर्फ मांडवा नामदेव सपकाळे, गौतम यशवंत पानपाटील रा. ज्ञानदेव नगर, जळगाव, विठ्ठल भगवान पाटील रा. ज्ञानदेव नगर, जळगाव, आकाश युवराज सपकाळे, योगेश उर्फ रितीक दिगंबर कोल्हे, अमोल छगन कोळी, संदीप ठाकूर, शिवकुमार इंगळे आणि अक्षय नामदेव सपकाळे सर्व रा. जळगाव यांच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात पोलीसांनी गौतम यशवंत पानपाटील वय ३८ रा. सावखेडा ता.जि.जळगाव आणि विठ्ठल भगवान पाटील वय-३६ रा. ज्ञानदेव नगर, जळगाव यांना अटक केली. अटकेतील दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायमुर्ती श्रीमती एम. एम. बडे यांनी सोमवार १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे सरकारी वकील ॲड. निखील कुलकर्णी यांनी काम पाहिले.

Exit mobile version