Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूर येथील दरोडाप्रकरणी दोघांना एलसीबीकडून अटक;चौघांचा शोध सुरु

arrested 765389

पहूर, ता जामनेर (वार्ताहर) औरंगाबाद-जळगाव राष्ट्रीय महामार्गावर मागील महिन्यात सराफा व्यापार्यावर झालेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणी स्थानिक गुन्हेशाखेने सोमवारी मध्यरात्री दोन जणांना अटक केली असून यात पहूर येथील दोन युवकांचा समावेश आहे. अन्य चार जणांचा एलसीबीचे पथक शोध घेत आहे. या घटनेत सहा जणांविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वाकोद येथील रहिवासी कमलेश किशोर छाजेड यांचे पहूर येथे सराफा दुकान आहे. मागील महिन्यात संध्याकाळी दुकान बंद करून आपल्या साथीदारासह वाकोदकडे दुचाकीने जात असताना पहूरपासून दोन कि.मी. अतंरावरील पेट्रोल पंपाजवळ अज्ञात सहा जणांनी कमलेश व त्याच्या साथीदारावर प्राणघातक हल्ला करून ९५ हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली होती. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत होते. कमलेश छाजेड यांच्या साथीदाराचा मोबाईल याघटनेत चोरीला गेला होता. या मोबाईलच्या लोकेशनवरून या घटनेचा पर्दाफाश होऊन एलसीबीने करून तपासाची चक्रे फिरविली. सोमवारी एलसीबीच्या पथकाने पहूर येथील प्रदीप रायदास पाटील (२३) व रोहित दिपक पाटील (१९) रा.पहूर पेठ या युवकांच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. अखेर काल रात्री या दोघांना ताब्यात घेऊन पहूर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. रात्री दोन वाजता यांना अटक करण्यात आली. या घटनेत एकूण सहा जणांविरुद्ध पहूर पोलीसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या पैकी दोन जणांना अटक करण्यात आली असून अन्य चार जणांचे नावे एलसीबी लवकरच यांच्याकडून काढून घेणार आहे. या युवकांच्या अटकेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

Exit mobile version