Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पहूरपेठ येथील दोन ज्येष्ठ नागरिक कोरोना पॉझिटीव्ह

पहूर , ता .जामनेर प्रतिनिधी । आज रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये येथील दोन ज्येष्ठ नागरिक कोरोना बाधीत असल्याचे आढळून आले असून यामुळे येथील एकूण पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ४६ इतकी झाली आहे.

पहूर पेठ येथे आज १ महीला व १ पुरुष अशा दोन ज्येष्ठ नागरीकांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगीतल. येथील उभ्या गल्लीवरील रहीवासी ५५ वर्षीय शेतकर्‍याच्या नंतर ३० वर्षीय त्यांच्या मुलाला त्यानंतर ३ वर्षीय चिमुकल्या नातीला आणि आज त्यांच्याच कुटूंबातील ७७ वर्षीय आजीचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. यामुळे आता एकाच कुटूंबातील चौघे जण उपचार घेत आहेत. तसेच संतोषी मातानगर येथील ७० वर्षीय ज्येष्ठ नागरीकांसही बाधा झाली असून गावकर्‍यांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, येथे सुरू असणार्‍या जनता कर्फ्यूला दुसर्‍या दिवशीही चांगला प्रतिसाद मिळाला. लेलेनगर भागात पाचोरा रस्त्यावर रविवारी भरणारा बाजार चार महिन्यांच्या लॉक डाऊन मध्ये आज प्रथमच बंद होता. तेथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असल्याने शुकशुकाट होता.
तर आजही तोंडाला मास्क न लावता विनाकारण फिरणार्‍या दहा जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे दोन हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे पहूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या 📱 स्मार्टफोनवर !

वेबसाईट: https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

टेलिग्राम चॅनल : https://t.me/joinchat/AAAAAE-eyexYv4VIejc_qw

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

जळगाव । भुसावळ । चाळीसगाव । अमळनेर । पाचोरा । भडगाव । धरणगाव । पारोळा । एरंडोल । रावेर । यावल । बोदवड । मुक्ताईनगर । जामनेर । चोपडा या सर्व तालुक्यांमधील बातम्या । ब्रेकिंग न्यूज । मराठी न्यूज । मराठी ब्रेकींग न्यूज । खान्देश । खान्देश बातम्या । खान्देश न्यूज

jalgaon । bhusawal । chalisgaon । amalner । pachora । bhadgaon । dharangaon । parola । erandol । raver । yawal । bodvad । muktainavar । jamner । chopda । khandesh । breaking news । marathi breaking news । jalgaon news । bhusawal news । khandesh news । chalisgaon news

Exit mobile version