Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन मोटारसायकलस्वारांची टक्कर : एकाचा मृत्यू; दोघे जखमी

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौकात दोन मोटरसायकलींच्या अपघातात एका ५८ वर्षीय इसम जागीच ठार झाला तर या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौकात २८ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दोन मोटरसायकलींची धडक झाली. या अपघातात संजय रतन पाटील (वय – ५८) रा. कोठली ता. भडगाव यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णवाहिका चालक अमोल पाटील यांच्या मदतीने संजय पाटील यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, या अपघातात नाना सुखदेव बोबडे (वय – ५८ रा. कोठली ता. भडगाव ) व इम्रान खान (वय – ३७ रा. भडगाव ) हे दोन जण जखमी झाले असुन त्यांचेवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश पाटील हे करीत आहे.

मयत संजय पाटील यांच्या पाश्चात्य पत्नी, दोन मुले असा परिवार असुन गेल्या ३ महिन्यांपूर्वी त्यांचे हृदयविकाराची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्या अपघाती निधनाने कोठली परिसरावर शोककळा पसरली आहे.

Exit mobile version