Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

सावद्यातील संसर्ग कायम; दोन महिलांना बाधा

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । अनेक उपाययोजना करून देखील येथील कोरोनाचा संसर्ग कायम असून आज पुन्हा दोन बाधीत महिलांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत.

सावदा येथे सातत्याने कोरोनाचा रूग्ण आढळून येत असून येथील संसर्ग कायम असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या पार्श्‍वभूमिवर, आज सकाळी पुन्हा दोन महिलांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील महिलांचे वय अनुक्रमे ४२ व १४ असून त्या काजीपुरा भागातील महावीर मंदिराच्या परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्या स्वॅबचे सँपल पॉझिटीव्ह आल्यानंतर प्रशासनाने त्यांचा रहिवास असणारा परिसर सील करण्यास प्रारंभ केला आहे. मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, आजच्या दोन बाधीत महिलांमुळे येथील एकूण पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ७४ इतकी झाली आहे.

Exit mobile version