भूषण कॉलनीतून तरूणाचे दोन मोबाईल लांबविले

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील भूषण कॉलनी परिसरातून विद्यार्थ्यांचे महागडे दोन मोबाईल लांबविल्याची घटना घडली आहे. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, तेजस सुनिल विखणकर (वय-१९) रा. खिर्डी ता. रावेर ह.मु. शांती सदन, भूषण कॉलनी हा शिक्षणासाठी भाड्याच्या खोलीत राहतो. गुरूवार १६ जून रोजी सकाळी ७ ते ९.३० वाजेच्या सुमारास त्याच्या खोलीतून अज्ञात चोरट्याने १७ हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल चोरून नेले. तेजसला हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने परिसरात शोधाशोध केली परंतू मोबाईल कुठेही आढळून आला नाही. दुपारी ४ वाजता त्याने रामानंदनगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र तावडे करीत आहे.

Protected Content