Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरुणाचे उशाशी ठेवलेले दोन मोबाईल लंपास

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील खोटेनगरातील हिरा गौरी पार्क येथे अंगणात झोपलेल्या तरुणासह त्याच्या वडिलांचा उशाशी ठेवलेले ९ हजारांचे २ मोबाईल चोरट्यांनी चोरून दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हिरा गौरी पार्क येथे किरण प्रेमलाल चौधरी वय 34 हे वास्तव्यास आहेत. उकाड्याचा त्रास होत असल्याने किरण चौधरी हे अंगणात खाट टाकून झोपले होते. सकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांच्या उशाशी ठेवलेले दोन मोबाईल घेऊन आले नाही. घरात विचारपूस केले तसेच इतरत्र शोध घेतला मात्र दोन्ही मोबाईल मिळून आले नाही, अखेर चोरीची खात्री झाल्यावर किरण चौधरी यांनी तालुका पोलिसात तक्रार दिली या तक्रारीवरून ९ हजारांचे दोन मोबाईल चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस नाईक उमेश ठाकूर हे करीत आहेत.

 

Exit mobile version