देशीदारूचे गोडावून फोडून दोन लाखांची रोकड लांबविली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुप्रीम कॉलनीतील देशीदारूचे दुकानाचे गोडावून अज्ञात चोरट्यांनी फोडून गल्ल्यातील २ लाख १५ हजार ५१० रूपयांच्या रकमेची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरातील गजानन बाबा कॉलनीत नितीन शामराव तायडे यांच्या मालकीचे देशी दारूचे गोडावून आहे. शुक्रवारी २५ मार्च रोजी दिवसभर काम करून त्याचे सहकारी भुपेश प्रकाश कुळकर्णी रा. देवेंद्र नगर यांनी दुकान बंद करून घरी गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी देशी दारूचे दुकानाचे गोडावून फोडले व गल्ल्यातील सुमारे २ लाख १५ हजार ५१० रूपयांची रोकड लांबली. दुकानातील कामगार पवन सुभाष चव्हाण हा शनिवार २६ मार्च रोजी सकाळी ७ वाजता कामावर गेला त्यावेळी गोडावून फोडल्याचे दिसून आले. याघटनेबाबत भुपेश कुळकर्णी आणि नितीन तायडे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेवून चौकशी केली असता अज्ञात चोरट्यांनी गोडावूनचे कुलूप तोडून गल्ल्याची रक्कम चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी भुपेश कुळकर्णी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे.

Protected Content