Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ट्रक- पिकअप वाहनाच्या अपघातात दोन जण जखमी;

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील पिंप्री ते चिंचपूरा गावामधील वळणावर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत पिकअप वाहन उलटी झाल्याने वाहनातील दोन जण जखमी झाल्याची घटना गुरुवार ११ मार्च एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता घडली. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात ट्रकवरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की. धरणगाव तालुक्यातील पिंप्री ते चिंचपुरा गाव दरम्यान वळणावर ट्रक क्रमांक (एमएच २० ईएल ७११८) वरील चालकाने समोरून येणाऱ्या पिकअप वाहन क्रमांक (एमएच १९ बीएम ३४५९) ला जोरदार धडक दिल्याची घटना गुरुवार ११ एप्रिल रोजी पहाटे ४ वाजता घडली. या अपघातात पिकअप वाहनावरील उमेश देविदास धामणे व रावसाहेब एकनाथ चौधरी हे जखमी झाले. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणे दुपारी १२ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ट्रकवरील चालक दादाराव बाबुराव अहिरे रा. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र कोळी हे करीत आहे.

Exit mobile version