Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रान डूक्करच्या हल्ल्यात दोघे जखमी

3a767576 7607 443d bd33 292955d3c137

 

जळगाव / जामनेर (प्रतिनिधी) शेतात आल्यानंतर अचानकपणे डुकराच्या हल्ल्यात आई आणि मुलगा जखमी झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील गारखेडा शिवारातील शेतात घडलीय. दोघांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आहे.

 

 

याबाबत माहिती अशी की, इंदूबाई हिरामण बेलदार (वय 60) आणि मुलगा परण हिरामण बेलदार (वय 30) दोघं रा. गारखेडा ता. जामनेर हे गारखेडा शिवारातील आपल्या शेतात दुचाकीने साधारण १२ वाजेच्या सुमारास पोहचले. शेताच्या बंधाऱ्यावर दुचाकी लावताच शेतातून अचानकपणे डूकराने हल्ला चढविला. आईच्या अंगावर डूक्कर हल्ला लढविणार तोवर परणने त्याला अडविल्याचा प्रयत्न केला. त्यावर चवताळलेल्या डुक्कराने त्याच्यावर पण हल्ला करत पायाला जखमी केले. त्यानंतर डुक्करने परत इंदूबाईवर हल्ला करत हाताला चावा घेऊन जखमी केले. दरम्यान, दोघांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version