Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ट्रक व डंपरच्या अपघातात दोनजण जखमी

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावानजीकच्या उड्डाणपुलाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने डंपरला जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी १९ नोव्हेंबर मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, साहेबराव पुना कोळी रा. दोनगाव ता.धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते डंपरचालक आहेत. रविवारी १९ नाव्हेंबर रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास साहेबराव कोळी हे डंपर क्रमांक (एमएच १५ एव्ही ४९४८) घेवून मुक्ताईनगर ते भुसावळ दरम्यानच्या बोहर्डी जवळील राष्ट्रीय महामार्गावरून जात असतांना समोरू येणारा ट्रक क्रमांक (आरजे ११ जीसी १३२३) ने डंपरला जोरदार धडक दिली. या धडकेत डपंरवरील चालक साहेबराव कोळी आणि क्लिनर कैलास धुडकू भाई हे दोघेजण गंभीर जखमी झाले. दरम्यान, ट्रकवरील अज्ञात चालक हा ट्रक जागेवर सोडून पसार झाला. याघटनेबाबत चालक साहेबराव कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकवरील अज्ञात चालकाविरोधात रात्री ९ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ नावीद अली करीत आहे.

Exit mobile version