Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खोटे नगरात दोन पानटपरी फोडणाऱ्या दोघांना अटक; एलसीबीची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । शहरातील खोटे नगरात दोन पान टपरी फोडून ऐवज लांबविणाऱ्या दोघांना राहत्या घरातून आज सोमवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अधिक माहिती अशी की, शहरातील खोटे नगरातील रिक्षा स्टॉप जवळ आलेल्या पानची टपारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडली होती. या गुन्ह्यातील आरोपी हे शहरातील समता नगरात असल्याची गोपनिय माहिती स्थानिेक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली त्यानुसार सहाय्यक फौजदार अशोक महाजन, पोहेकॉ दादाभाऊ पाटील, प्रदीप पाटील, जयंत पाटील, पोलीस नाईक नंदलाल पाटील, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, भगवान पाटील, पोकॉ. सचिन महाजन आणि चालक अशोक पाटील यांनी आज सांयकाळी सापळा रचून संशयित आरोपी भरज संजय सपकाळे (वय-२१) आणि श्याम सोपान कळस्कर (वय-२१) दोन्ही रा.  समता नगर यांना अटक केली. दोघांनी खोटे नगरात दोन पान टपरी फोडल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल आणि रोख रूपये हस्तगत करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी दोन्ही संशयितांना तालुका पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

 

 

 

Exit mobile version