Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ट्रकने रिक्षा व क्रूझरले उडविले, पारोळा तालुक्यातील दोघांसह तिघांचा मृत्यू

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धुळे जिल्ह्यातील आर्वी शिवारात झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार झाले असून यात पारोळा तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, मालेगावहून भरधाव वेगात येणार्‍या एमपी-०९-एचएच-५२०३ या क्रमांकाच्या ट्रकने एमएच-४१-एटी-०३४७ या क्रमांकाच्या बसला जोरदार धडक दिली. याच ट्रकने त्याचवेळी धुळ्याकडून नाशिकच्या दिशेने क्रुझर (एमएच-२१-व्ही-२१५९) जात होती. तिला ट्रकने समोरून धडक दिली. या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. यात सरला पंडित सोनवणे (वय २८), महेंद्र चुडामण सोनवणे (वय ५१, दोघे रा. तरडी, ता. पारोळा, जि. जळगाव) आणि ऍपेरिक्षा चालक रईस शेख (वय ४८, रा. मालेगाव, जि. नाशिक) या तिघांचा समावेश आहे.

या अपघातात प्रमोद रमेश सोनवणे, सुरेश नारायण सोनवणे, शैलेश पंडित सोनवणे, विद्या भूषण कानडे, ताराबाई अशोक वसरे, सुपडू बारकू वसरे, कोमल प्रमोद सोनवणे, वसंत पंडित वंजारी, सुधीर अभिमन पाटील, अरुणा प्रमोद पाटील आदी जखमी झाले आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातानंतर ट्रकचा चालक फरार झाला असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version