Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दोन मित्रांना मारहाण करून बॅग लांबविली !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजी नगरातील स्मशानभूमीजवळ दुचाकीवरील दोन मित्रांना मारहाण करून त्यांच्याजवळील बॅग जबरी हिसकावून त्यातील पैसे काढून बॅग नाल्यात फेकून दिल्याचा प्रकार मंगळवारी २३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी बुधवारी २४ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तौसिफ सईद शेख वय २३ रा. गेंदालाल मिल, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. मंगळवारी २३ एप्रिल रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास तौसिफ हा त्याचा मित्र अरबाज रूहुल्ला शेख याच्या सोबत दुचाकीने शिवाजी नगरातील स्मशानभूमीजवळून जात असतांना त्या ठिकाणी पाठीमागून दुचाकीने आलेल्या तीन जणांनी तौसिफची दुचाकी आडविली. तिघांनी तौसिफ आणि अरबाज यांना मारहाण केली. तसेच तौसिफजवळ असलेली बॅग जबरी हिसकावून नेत बॅगेतील पैसे काढून ती बॅग जवळच्या नाल्यात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना घडल्यानंतर तौसिफ सईद शेख यांनी याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात बुधवारी २४ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर राकेश आनंदा कोळी वय २४ रा. कांचन नगर, जळगाव याला अटक केली तर त्याचे दोन्ही साथीदार हे फरार झाले आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा ह्या करीत आहे.

Exit mobile version