Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जुन्या भांडणाच्या कारणावरुन चिंचोली गावात दोन कुटुंबीयात हाणामारी

जळगाव प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन गटात तुडुंब हाणामारी झाल्याची घटना तालुक्यातील चिंचोली येथे २५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्पर विरूध्द १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.  

अधिक माहिती अशी की, विशाल निंबा वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जुन्या भांडणाच्या कारणावरुन २५ एप्रिल रोजी रात्री त्यांच्या घरात दहा जणांनी अनधिकृतपणे प्रवेश करुन वाघ यांच्यासह त्यांचा मुलगा व आई यांना मारहाण केली. डोळ्यात मिरचीपुड फेकुन वाघ यांच्या आईच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकाऊन नेली. या प्रकरणी सचिन सुरेश ढाकणे, राजेश मधुकर घुगे, संजय मधुकर घुगे, संजय पुना घुगे, अक्काबाई सुरेश ढाकणे, सुरेश काशिनाथ ढाकणे, लताबाई संजय घुगे, प्रियंका सचिन ढाकणे, राजु मधुकर घुगे व सोनी अनिल वाघ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच अलकाबाई सुरेश ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, खरगटे पाणी अंगणात फेकण्याचे तसेच मागील भांडणाच्या कारणावरुन तीघांनी त्यांच्यासह मुलगा व भावास मारहाण केली. या प्रकरणी विशाल निंबा वाघ, भैय्या निंबा वाघ व मुन्नाबाई निंबा वाघ या तीघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version