Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दिल्ली रेल्वे स्थानकात एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना भीषण आग

816851 train 970

नवी दिल्ली, वृत्तसंस्था | येथील रेल्वे स्थानकात थांबलेल्या एका एक्स्प्रेसला शुक्रवारी (दि.६) दुपारी आग लागली. प्राप्त माहितीनुसार, चंदीगड-कोचिवली एक्स्प्रेसच्या पॉवर कारमध्ये ही भीषण आग लागली. आगीची धग दोन डब्यांपर्यंत पोहोचल्याने स्थानकात काही वेळ गोंधळ उडाला होता.

 

रेल्वे स्थानकात ही एक्स्प्रेस थांबली होती. त्याचवेळी तिच्या पॉवर कारमधून धूर निघू लागला, त्यानंतर काही क्षणांतच आग भडकली. थोड्या वेळात ही आग एक्स्प्रेसच्या अन्य दोन डब्यांमध्येही पसरली. आग लागल्याची माहिती कळताच, आजूबाजूचे लोक पळू लागले. या घटनेत फलाटाचेही काहीसे नुकसान झाले आहे. दरम्यान, सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी अथवा जखमी झालेले नाही. सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात येवून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली. आगीचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Exit mobile version