Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चाळीसगावात वीजेच्या धक्क्याने दोन चिमुकल्यांचा मृत्यू

चाळीसगाव प्रतिनिधी । घराबाहेर असलेला पत्र्याच्या कुलरला खेळताना दोन चिमुकल्यांना शॉक लागून त्यातच त्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज शहरातील मेहतर कॉलणी येथे घडली असून एकच खळबळ उडाली आहे.

अधिक माहिती अशी की, राणु विकी गोयल (वय- ३ वर्ष) व रोहन राकेश गोयल (वय- ३ वर्ष) रा. मेहतर कॉलनी ता. चाळीसगाव दोघेही घरासमोर खेळत होते. दरम्यान पत्र्याचा कुलर बाहेर चालू असताना अचानक कुलरचा शॉक बसला व त्यातच दोघांचा दुदैवी मृत्यू झाला. हि घटना दुपारी १२.३० च्या सुमारास घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परिस्थिती हलाखीची असल्याने वडील विकी गोयल व राकेश गोयल दोघेही खासगी दवाखान्यात साफसफाईचे काम करून आपल्या कुटुंबाची उदरनिर्वाह करीत असतात. मात्र हे अपघात घडल्याने दोघांवर डोंगरच कोसळला आहे.

Exit mobile version