Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

किरकोळ कारणावरून दोन भावांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील संजय नगरात किरकोळ कारणावरून दोन भावांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शनिवारी २२ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता घडली. याप्रकरणी रविवारी २३ जून रोजी रात्री १० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

धरणगाव शहरातील संजय नगरात अर्जून राजेश सुर्यवंशी वय २७ हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शनिवारी २२ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता राहत्या घरासमोर ओम विजय मोरावकर रा. मोची वाडा, संजय नगर, धरणगाव यांच्यासोबत वाद झाला. या वादातून ओम मोरावकर याने हातात लोखंडी रॉड घेवून अर्जून सुर्यवंशी आणि त्याचे भाऊ जय सुर्यवंशी यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोघांना गंभीर दुखापत झाली. दोघांना धरणगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर रविवारी २३ जून रोजी रात्री १० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ओम विजय मोरावकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक प्रमोद पाटील हे करीत आहे.

Exit mobile version