Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

रिक्षा लावण्यावरून दोन भावांमध्ये हाणामारी; परस्परविरोधात गुन्हे दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शिरसोली रोडवरील विनोबा नगरात शेजारी राहणाऱ्या दोन भावांसह कुटुंबियांमध्ये रिक्षा लावण्यावरून शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली आहे. याबाबत दोन भावांवर परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिरसोली रोडवरील मोहाडी फाट्याजवळी विनोबा नगरात उमेश लालसिंग परदेशी आणि निखील लालसिंग परदेशी हे दोन्ही भाऊ शेजारी शेजारी राहतात. सोमवार २० जून रोजी सायकाळी ६ वाजेच्या सुमारास निखील परदेशी यांनी त्यांच्या रिक्षा घराच्या गेटसमोर पार्क करून लावली होती. या कारणावरून शेजारी राहणारा भाऊ उमेश परदेशी आणि त्याची पत्नी मेघा उमेश परदेशी यांनी अश्लिल शिवीगाळ करून मारहाण केली. तर प्रतिकार म्हणून निखील परदेशी आणि त्याची पत्नी अपेक्षा निखील परदेशी यांनी देखील दोघांना शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत दोन्ही कुटुंबियांनी एमआयडीसी पोलीसात रात्री १०.३० वाजता धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून परस्पर विरोधात चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकॉ नितीन पाटील करीत आहे.

Exit mobile version