Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावच्या मेहरूण तलावात दोन सख्या भावंडांचा बुडून मृत्यू (व्हीडीओ)

df3859df 1241 4814 bec7 152486623c0a

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील मेहरुण तलावात पोहायला गेलेल्या तीन भावंडांपैकी दोन सख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सायंकाळी घडली. दरम्यान, दोन्ही भावांचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले असून नातेवाईकांचा मन हेलावून सोडणारा आक्रोश सुरु आहे.

 

या संदर्भात अधिक असे की, मोहंमद अनस जकी अहमद (वय १४), महंमद उमेर जकी अहमद (वय १२) आणि मोहंमद अबूलैस जकी अहमद (वय 16, तिघं रा. अल अजीज अपारमेंट अक्सा नगर, मेहरूण जळगाव) हे सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास एकत्र मेहरूण तलावाकडे फिरण्यासाठी गेले होते. यावेळी तिघे भाऊ पोहण्यासाठी पाण्यात उतरले. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने महंमद उमेर आणि अबूलैस जकी हे पाण्यात बुडाले. तर अनिस जकी थोडक्यात बचावला. दरम्यान, तिघेजण बुडत असताना बाजूला असलेल्या परवेज अख्तर, सबिरोद्दीन पिरजादे, बबलू पिरजादे यांनी अनिस याला वाचविले. परंतू दोघांना ते वाचवू शकले नाहीत. दरम्यान, दोघं भावंडांचे मृतदेह बाहेर काढत जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले आहेत. जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती.

Exit mobile version