Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ममुराबाद बसस्थानकाजवळ दोन दुचाकी धडकल्या; जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील ममुराबाद बसस्थानकाजवळ दोन समोरासमोर दुचाकीच्या झालेल्या धडकेत तरुण किरकोळ जखमी झाला आणि दुचाकीचे नुकसान झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रविवार, दि १७ जुलै रोजी दुपारी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जळगाव तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “अविनाश चंद्रभान पाटील (वय-२८) रा. लोणी ता. चोपडा जि. जळगाव हा तरुण मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतो. १ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजता कामावरून घरी जाण्यासाठी त्याची दुचाकी (एमएच १९ डीएल ३०७५) याच्यावरून घरी जात असताना जळगाव तालुक्यातील ममुराबाद बस स्थानकाजवळ समोरून येणारी दुचाकी (एमएच १९ सीडी १९१६) ने जोरदार धडक दिली.

या धडकेत अविनाश पाटील किरकोळ जखमी झाले परंतु त्यांच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी तब्बल १६ दिवसानंतर रविवारी १७ जुलै रोजी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून दुचाकीस्वार राहुल दिनकर वानखेडे रा. चुंचाळे तालुका यावल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक बापू कोळी करीत आहे.

Exit mobile version