Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक; एक जखमी

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वाजता सुमारास घडली. ही घटना घडल्यानंतर नजीकचे जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व जखमीस जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय समोर दुचाकीधारक (एमएच १९ बीडब्ल्यू ५३६९) हे स्वातंत्र्य चौकातून आकाशवाणी चौककडे जात असताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुकीच्या मार्गाने येत असलेल्या दुचाकी क्रमांक (एमएच १९ जी ८७७७) वरील दुचाकीधारकने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वार जखमी झाला आहे त्याला  तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ.जयस्वाल यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन दोन्ही वाहनांचा पंचनामा केला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही.

Exit mobile version