Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

फैजपूर यावल रोडवर धारदार शस्त्र व गावठी कट्ट्यासह दोघांना अटक

फैजपूर प्रतिनिधी । फैजपूर यावल रोडवरील हॉटेल तृभावी समोर दोन तरूणांना धारदार चाकू व  गावठी कट्ट्यासह अटक केल्याची घटना आज सोमवारी १२ जुलै रोजी सायंकाळी  तीन जीवंत काडतूस आणि धारदार चाकू हस्तगत केला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल फैजपूर रस्त्यावर असलेल्या हॉटेल तृभावी समोर किरकोळ कारणावरून संशयित आरोपी विशाल गणेश सपकाळे (वय-२९) आणि दिपक शांताराम सपकाळे (वय-२६) दोन्ही रा. रा. आमोदा ता. यावल या दोघांमध्ये आज १२ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता वाद सुरू झाला. अचानक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोघेजण शस्त्र हातात घेवून हाणामारी करत असल्याची माहिती फैजपूर पोलीसांनी मिळाली. फैजपूर पोलीस स्टेशनचे सपोनि प्रकाश साहेब, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, न्हावी बीटचे पोहेकॉ राजेश बऱ्हाटे, होमगार्ड श्रीकांत इंगळे यांनी घटनास्थळी धाव घेवून दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडून गावठी बनावटीचे पिस्तूल व ३ जीवंत काडतूसे व धारदार शस्त्र असा एकुण २३ हजार ३०० रूपयांचा हस्तगत केले.  दोघांवर फैजूपर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेश बऱ्हाटे करीत आहे.

Exit mobile version