Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जिल्हा कारागृहात गावठी पिस्तूल पुरविणाऱ्या दोघांना अटक

जळगाव प्रतिनिधी । कारागृहात आरोपींना पिस्तुल व काडतूस पुरविणाऱ्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १ सप्‍टेंबर रोजी सायंकाळी अटक केली. त्याकउून एक गावठी पिस्तूल हस्तगत केली आहे. तर यातील मुख्य संशयित आरोपी अद्याप फरारच आहे.

नागेश मुकुंदा पिंगळे (वय-२१, रा.अमळनेर) व अमीत उर्फ नितेश सुदर्शन चौधरी उर्फ बिहारी (रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव मुळ रा.बिहार) अशी अटक झालेल्या दोघांची नावे आहेत. तपासाधिकारी बापू रोहोम यांनीसागर पाटीलसह १ रोजी अटक केलेल्या नागेश व अमीत चौधरी यांना बुधवारी ऑनलाईन न्यायालयात हजर केले असता तिघांना ८ सप्टेबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सुशील मगरे व गौरव पाटील यांच्याबाबत सागर पाटील याच्याकडे चौकशी केली असता तो पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे देवून वेळ मारुन नेत आहे. अमीत उर्फ बिहारी व जगदीश या दोघांनी गणेश नगराकडून कारागृहात भींतीवरुन काडतूस व पिस्तुल फेकून मगरे याला पुरविले आहे.शिंदखेडा येथील एका जणाने जगदीश पाटील याला गावठी पिस्तुल पुरविल्याचेही उघड झाले आहे.

पुण्यातील कोथरुडमध्ये सोने विक्रीच्या दुकानात शस्त्रधारी दोघांनी दरोडा टाकला होता. त्यात सुशील मगरे याच्यासोबत आता अटक केलेला अमीत उर्फ बिहारी हा देखील होता. अमीत हा मुळचा बिहारचा असून रामेश्वर कॉलनीत वडीलांसोबत इलेक्ट्रीक फिटींगचे काम करतो, मगरेच्या संपर्कात आल्याने धाडसी गुन्ह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाला.

Exit mobile version