दगडाने ठेचून तरूणाचा निर्घृण खून करणाऱ्या दोघांना अमळनेरातून अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कासमवाडी भागात असलेल्या मैदानावर पैशांच्या देवाण घेवाणच्या कारणावरून २७ वर्षीय तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना सकाळी उघडकीला आली होती. या गुन्ह्यातील दोन संशयितांना अमळनेरातून अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरीफ शहर अय्युब शहा (वय-२६) रा. छोटा सलार नगर आणि जुबेर शेख भिका सिकलिगर (वय-२२) रा. मासुमवाडी, कासमवाडी जळगाव अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहे. दोघांनी सागर वासूदेव पाटील (वय-२७) रा. लाठी शाळेजवळ, ईश्वर कॉलनी याचा खून केला होता.

जळगावात पुन्हा मर्डर : कासमवाडीतील तरूणाला दगडाने ठेचले

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील ईश्वर कॉलनी परिसरात सागर वासुदेव पाटील हा तरुण कुटुंबियांसह राहत होता. मिळेल ते काम करीत होता. गुरुवारी २ जून रोजी रात्री तो नेहमीप्रमाणे घरी आला. कुटुंबियांशी गप्पा केल्यानंतर रात्री १ वाजेच्या सुमारास त्याला अनोळखी दोनजण बोलवायला आल्याने तो आईला सांगून घराबाहेर पडला. सागरसह त्याचे मित्र हे कासमवाडीतील आठवडे बाजाराच्या मैदानावरच रात्री बसत होते. या आठवडे बाजाराच्या मैदानावर रात्रीच्या वेळी बरेच गुंड आणि टवाळखोर तरुण बसलेले असतात. याच आठवडे बाजाराच्या मैदानावर बसलेला असताना सागर पाटील याचा आरीफ शहा अय्युब शहा आणि जुबेर शेख भिका सिकलिगर यांच्या पैशांच्या देवाणघेवाण वरून वाद झाला. वाद वाढल्याने दोघांनी सागरच्या डोक्यात दगड टाकून हत्या केली. शुक्रवारी ३ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडलेला प्रकार उघडकीला आला होता. याबाबत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

‘त्या’ हत्या प्रकरणाचे आजच्या खुनाशी आढळून आलेय साम्य !

 

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीसांचे पथक संशयिताच्या शोधार्थ रवाना झाले होते. या गुन्ह्यातील दोन्ही संशयित आरोपी हे अमळनेर येथे त्यांच्या नातेवाईकांकडे जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक रवाना केले. गुन्ह्यातील दोन्ही संशयित आरोपींना आरीफ शहर अय्युब शहा (वय-२६) रा. छोटा सलार नगर आणि जुबेर शेख भिका सिकलिगर (वय-२२) रा. मासुमवाडी, कासमवाडी जळगाव अमळनेर येथील बुलढाणा अर्बन बँकेजवळून पोलीसांनी अटक केली.

Protected Content