Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना अटक; ८० हजारांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव/चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव ते वाघळी दरम्यानच्या बोरखेडा गावाजवळील हॉटेल रायगड येथे दुचाकीने गुटख्याची वाहतूक करतांना दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ८० हजार ७२० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव ते वाघळी रस्त्यावरील बोरखेडा गावाजवळील हॉटेल रायगड येथून दुचाकीने गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने २१ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता कारवाई करत संशयित आरोपी अन्सारी सईद अहमद (वय-३४) रा. जाफरनगर, मालेगाव आणि शेख इरफान शेख युनूस रा. सायगाव ता.चाळीसगाव यांना अटक केली. त्यांच्याकडून ८० हजार ७२० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोहेकॉ शांतराम सिताराम पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांवर चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव करीत आहे.

Exit mobile version