Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

बळीराम पेठेत कपड्याचे दुकान फोडणारे दोघे अटकेत

जळगाव प्रतिनिधी । बळीराम पेठेतील गारमेंट दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील कपडे व रोकड असा एकुण ४८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे आज २६ जुलै सकाळी १० वाजता उघडकीला आले. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोन संशयितांना शहर पोलीसांनी अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पवन जय रामदास कुकरेजा (वय-४०) रा. गणपती नगर, जळगाव यांचे बळीराम पेठेत वरूण गारमेंट नावाचे रेडीमेड कपड्याचे दुकान आहे. त्यांच्या दुकानाच्या बाजूला त्यांचे भाऊ विजय कुकरेजा यांचे देखील कपड्याचे दुकान आहे. या दोन्ही दुकानावरती दोन्ही भाऊ व चार नोकर काम करतात. लॉकडाऊन असल्यामुळे शुक्रवारी २३ जुलै रोजी दुपारी ४ वाजता दुकाने बंद करून घरी गेले. दरम्यान शनिवार-रविवार दुकाने बंद होती. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद दुकान फोडून दुकानातील ८ हजार रूपये रोख आणि ४० हजार रूपयांची रोकड असा एकुण ४८ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे आज रविवारी सकाळी १० वाजता उघडकीला आले. यासंदर्भात पवन कुकरेजा यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्यातील संशयित आरोपी हे फुले मार्केट मध्ये चोरीचे कपडे विक्री करत असल्याची गोपनिय माहिती पो.कॉ. तेजस मराठे आणि  योगेश इंधाटे यांना मिळली. त्यानुसारपोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ विजय निकुंभ, रतन गिते, गणेश पाटील, अक्रम शेख, भास्कर ठाकरे, उमेश भांडारकर यांनी कारवाई करत संशयित आरोपी निलेश सुरेश वाणी (वय-३०) आणि चेतन दिलीप चौधरी (वय-२६) दोन्ही रा. कांचन नगर यांना अटक केली. दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय निकुंभ करीत आहे.

 

Exit mobile version