Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगरात बायो डिझेलचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील पुर्णाड शिवारात असलेल्या मोकळ्या जागेत बायोडिझेलची बेकायदेशीर साठवणूक व काळाबाजार करून विक्री करतांना पुरवठा विभागाने छापा टाकून सुमारे १० लाख ७५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केले आहे. दोन जणांना अटक केली असून चार जणावर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड शिवारातील मुक्ताईनगर-बऱ्हाणपूर रस्त्यावर असलेले मुक्ताईनगर तोल काटा येथे राजेंद्र सिताराम वाघले यांच्या मालकीच्या जागेत बायो डिझेलची मोठ्या प्रमाणावर साठवणूक करून त्यांची विक्री होत असल्याची गोपनिय माहिती मुक्ताईनगर पुरवठा निरीक्षकांना मिळाली. त्यानुसार रविवारी १९ सप्टेंबर रेाजी रात्री १ वाजता पुरवठा विभागाने छापा टाकून सुमारे ६ लाख ६६ हजार रूपये किंमतीचे बायोडिझेल आणि ४ लाख ९ हजार ४७० रूपयांची रोकड असा एकुण १० लाख ७५ हजार ४७० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक ऋषीकेश तानाजी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी निलेश युवराज सपकाळे रा. निसर्ग कॉलनी असोदा रोड जळगाव, राजेंद्र सिताराम वाघले रा. शहापूर, रितेश नारायणराव दोरताणी (वय-२१) रा. परतवाडा अचलपूर अमरावती, चिराग गोपाल शिराठ (वय-२६) रा. आसोदा रोड जळगाव यांच्यावर मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात दोन जणांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूल खताळ करीत आहे.

Exit mobile version