Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळा बस स्थानकातून विद्यार्थ्यांच्या खिशातून बारा हजार लंपास

Crime 21

पारोळा, प्रतिनिधी | तालुक्यातील देवगाव येथील विद्यार्थी समाधान आबा मिस्त्री हा दि. १३ रोजी येथील बस स्थानकावर आपले आजी-आजोबा यांना सोडण्यासाठी गेला असता बसमध्ये चढत असतांना त्याच्या खिशातून १२ हजार चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन लंपास केल्याची घटना घडली.

सविस्तर वृत्त असे की, पारोळा बस स्थानकावर समाधान आबा मिस्त्री हा दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्याचे बाबा आबा भाऊराव मिस्त्री व त्यांच्या पत्नी यांना सोडण्यासाठी गेला असता मुक्ताईनगर मालेगाव या बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन त्याच्या खिशातील त्याच्या खिशातील अकरा हजार आठशे रुपये रोख रक्कम काढून घेतली. तो बस मधून उतरत असतांना त्याच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने संशयित दोन महिला नंदा ज्ञानदेव राठोड, छकुली राठोड राहणार देवी तांडा तालुका चाळीसगाव अशांना पोलिसांच्या ताब्यात दिले. ते त्यांचे बनावट नाव सांगत असून त्यांचे खरे नाव काढण्यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. याबाबत समाधान आबा मिस्त्री यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे करीत असून याबाबत या महिलांकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलिसांनी कसून तपासणी करण्याची मागणी सर्वत्र होत आहे.

Exit mobile version