Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

टीव्ही अभिनेता कुशल पंजाबीची राहत्या घरात आत्महत्या

TV actor Kushal Punjabi

 

मुंबई प्रतिनिधी । टीव्ही अभिनेता कुशल पंजाबी याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. कुशल पाली हिल्स येथील त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आला असून वांद्रे पोलिसांना मृतदेहाशेजारी मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी देखील सापडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुशलने १९९५ मध्ये ‘अ माउथफुल ऑफ स्काई’ या मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर त्याने ‘लव मैरिज’, ‘सीआयडी’, ‘देखो मगर प्यार से’, ‘कभी हां कभी ना’, ‘ये दिल चाहे मोर’, ‘श्श्श… फिर कोई है’, ‘आसमान से आगे’, ‘झलक दिखला जा 7’, ‘अदालत’, ‘सजन रे झूठ मत बोलो’ ‘ईश्क मै मरजावा’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

Exit mobile version