Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तुषार पाटील यांचा शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील तुषार सांडूसिंग पाटील यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख या आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.

या पत्रात त्यांनी “गेल्या १८ वर्षांपासून विद्यार्थी सेनेपासून शाखाप्रमुख, गट प्रमुख, विभाग प्रमुख आणि उपतालुका प्रमुख यानंतर १५ वर्षापासून यावल उपजिल्हाप्रमुखाची जबाबदारी सांभाळत होतो; परंतु दीड वर्षापूर्वी संघटनेच्या बैठकांना पासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जात असल्याचं सांगत पक्षात काम करत असताना डावलण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे नमूद करत या सर्व प्रकाराला कंटाळून नाइलाजाने शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं.

Exit mobile version