Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अतिरिक्त लोडशेडिंग बंद करा ; – उबाठा सेनेचा कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक मोर्चा

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  १ सप्टेंबर २०२३ पासुन पाचोरा व भडगाव तालुक्यात होणारी लोड शेडिंग बंद करण्यात यावी या मागणीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी, जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील यांच्या नैतृत्वाखाली शहरातील गिरड रोडवरील महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडक मोर्चा काढत कार्यकारी अभियंता यांना लोड शेडींग बंद करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

या प्रसंगी तालुका प्रमुख शरद पाटील, शहर प्रमुख अॅड. दीपक पाटील, अनिल सावंत, विधानसभा क्षेत्र प्रमुख जे. के. पाटील, शहर संघटक राजेंद्र राणा, भडगाव शहर प्रमुख मनोहर चौधरी, शंकर मारवाडी, पाचोरा शहर संघटक दादाभाऊ चौधरी, मा. शहर प्रमुख भारत खंडेलवाल, युवासेना उपजिल्हा संघटक गौरव पाटील, युवासेना तालुका अध्यक्ष शशी पाटील, जिल्हा संघटिका तिलोत्तमा मौर्य, महिला आघाडीच्या मंदाकिनी पारोचे, कुंदन पंड्या,  जयश्री येवले, अनिता पाटील, विलास पाटील, आबा देसले, पप्पू जाधव, मनोज चौधरी, भरत पाटील, अजय पाटील, निलेश गढरी, दादाभाऊ तडवी, नितीन लोहार, हेमंत पाटील, फहीम शेख, अनिल परदेशी, एकनाथ अहिरे, गुरुलाल पवार, दत्तू अहिरे, अभिषेक खंडेलवाल, खंडू सोनवणे, प्रवीण शिंदे, प्रवीण वाघ, निखिल सोनवणे, मयूर भोई, राहुल पाटील, नितीन खेडकर, गौरव पाटील यांचेसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पाचोरा – भडगाव तालुक्यात एक महिना उशिरा पेरण्या झाल्या आहेत. जुलै – ऑगस्ट महिन्यात साधारण पाऊस झाला. गेल्या वीस दिवसांपासून  पावसाने ओढ दिली. त्यामुळे पिके करपून चालली आहेत. खरिपाचा हंगामा धोक्यात येण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे. पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे.शेतकरी राजा चिंताग्रस्त आहे, विहिरीत थोड्याफार प्रमाणात पाणी साठा शिल्लक आहे. मात्र सतत लोड शेडिंग मुळे बळीराजा आपले सोन्यासारखे पिकं वाचू शकत नाही डोळ्यासमोर पीक नष्ट होतांना पाहत आहे. दुबार पेरणी, पावसाची ओढ, पेरणी साठी कर्ज काढून केलेला खर्च, उत्पन्नाची हमी नाही. अशा भयावह परिस्थितीमुळे बळीराजा हतबल झालेला आहे.घरगुती विजपुरवठ्याच्या अतिरिक्त लोड शेडिंग मुळे लहान मुले, वृद्ध आई-बाबा, नागरिक हैराण झालेले आहेत. मच्छर व डासांचा त्रास आहे. ऐन झोपेच्या वेळी वीज गायब होते त्यामुळे मनस्ताप निर्माण होतो.

सुरळीत वीज पुरवठा करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. वीज पुरवठा मिळणे हा बळीराजाचा हक्क आहे. मात्र शासन  प्रशासनाच्या आडमुठेधोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. पाचोरा भडगाव शिवसेना पक्ष हे कदापि सहन करणार नाही तत्काळ लोडशेडिंग रद्द करून तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार आंदोलन छेडणार तथा दि. ९  सप्टेंबर २०२३ रोजी पाचोरा येथील शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री महोदयांना घेराव घालणार असल्याचा इशारा देखील निवेदनाद्वारे देण्यात आला असुन होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार रहाल. अशा आषयाचे निवेदन पाचोरा वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांना देण्यात आले आहे.

Exit mobile version