Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नागपुरचे आयुक्त तुकाराम मुंढेंची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये बदली

मुंबई प्रतिनिधी । नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची मुंबई जीवन प्राधिकरणात बदली करण्यात आली आहे. शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ख्यात असणारे मुंढे यांना पुन्हा एकदा साईड पोस्टला टाकण्यात आल्याचे यातून दिसून आले आहे.

अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्यात असणारे नागपूर महापालिका आयुक्तपदी असणार्‍या तुकाराम मुंढे यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांची मुंबईतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये बदली करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्या जागी राधाकृष्णन बी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांना आपल्या पदाचा कार्यभार राधाकृष्णन यांच्याकडे सोपवून त्वरित नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्यास सांगण्यात आलं आहे.

कालच तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यामुळे ते सध्या विलगीकरणात आहेत. क्वॉरंटाईन असतांनाच त्यांची बदली करण्यात आली आहे.

Exit mobile version