Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ईदगाह ट्रस्टच्या विश्वस्त सदस्यांनी घेतली वृक्ष संगोपणाची जबाबदारी

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एसटी वर्कशॉप ते अजिंठा चौक या प्रमुख मार्गाला लागूनच जळगावसह जिल्ह्यातील मुस्लिम समाजाची मुस्लिम इदगाह, कब्रस्तान व शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि त्या रस्त्याला लागूनच असलेल्या, वापरात नसलेल्या जागेवर ५० विविध प्रकारची वृक्ष लावण्यात आली असून त्या वृक्षाची संगोपनाची जबाबदारी ईदगाह ट्रस्टचे विश्वस्त व इतरांनी यांनी घेतलेली आहे.

यावेळी ईदगाह मैदानावर सुद्धा शंभर वृक्ष लावण्यात आली असून त्याचे संगोपन हे ट्रस्टतर्फे केले जात आहे. नुकतेच संपूर्ण परिसर सुशोभीकरण अंतर्गत फुल झाडे लावण्याचे कार्य हाती घेतलेले आहेत. कोरोना मुळे वृक्षारोपणचे महत्व  पटले. यावेळी जनरल सेक्रेटरी फारूक शेख यांनी सांगितले की, कोरोना महामारी मुळे सर्व साधारण व्यक्तीच्या मुखात प्रथम हेच वाक्य यायचे की आजारी माणसाचे ओटू किती आहे म्हणजे ऑक्सिजन ची मात्रा किती प्रमाणात आहे. तेव्हा कळले की आरोग्यासाठी ऑक्सिजन व ऑक्सिजन साठी वृक्षारोपण हे गणित समजल्याने ही संकल्पना राबविण्यात येत आहे. तर या सुशोभीकरणात ज्यांना सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी ईदगाह ट्रस्टच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांनी केले आहे.

याप्रसंगी  फारुक शेख , अनिस शाह, मझर पठान, नजीर मुलतानी, ताहेर शेख (सर्व विश्‍वस्त) फैसल मलिक (मलिक फाउंडेशन) मुन्ना मामु( लकी कार बाजार)  अनवर मलिक (बाबा मोटर्स) श्री मुन्ना हाजी( ऑटो कॉन्सल्टंट) अजिज खान, पालधी चे फारूक मॅकेनिक, वासिफ खान (अल्फा आर्ट) अतिक हबीब  पटेल (डिलक्स कार बाजार)  यांनी वृक्ष संगोपनाची जबाबदारी घेतली.

 

Exit mobile version