Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मोदींच्या भूमिकेला ट्रम्प यांचे पूर्ण समर्थन

modi and trump

बियारित्स, वृत्तसंस्था | जी ७ परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. या चर्चेच्या वेळी पंतप्रधान मोदींनी हे स्पष्ट केले की, भारत आणि पाकिस्तानचे मुद्दे द्विपक्षीय आहेत आणि कोणत्याही देशाला यासाठी कष्ट घेण्याची आवश्यकता नाही. काश्मीरमधील परिस्थिती आता पूर्ण नियंत्रणात आहे. ट्रम्प यांनीही मोदींच्या भूमिकेचे समर्थन केले आणि त्यांना मोदींवर पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले.

 

मोदी म्हणाले की, ‘भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान अनेक द्विपक्षीय मुद्दे आहेत. पाकिस्तानमध्ये निवडणुका झाल्यानंतर पंतप्रधानांना मी फोन करून शुभेच्छा देताना सांगितले होते की, पाकिस्तानला आरोग्य, गरीबी, शिक्षणाचा अभाव अशा मुद्द्यांवर लढायला हवे. दोन्ही देश मिळून याविरोधात लढूया. दोन्ही देश जनतेच्या भलाईसाठी काम करतील.’

यावर ट्रम्प म्हणाले, ‘आम्ही काल रात्री काश्मीर प्रश्नावर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी सांगितले की, परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात आहे. मला आशा आहे की, ते चांगले काम करण्यात यशस्वी होतील. भारत आणि पाकिस्तान समस्येवर एकत्रित तोडगा काढतील.’

सात विकसित श्रीमंत देशांच्या या जी-७ समुहात भारत विशेष आमंत्रित सदस्य आहे. जी-७ समुहात फ्रान्स, जर्मनी, ब्रिटन, इटली, अमेरिका, कॅनडा आणि जापान या राष्ट्रांचा समावेश आहे.

Exit mobile version