Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

म्हसावद येथील महामार्गावर ट्रक पलटी; सुदैवाने जीवीत हानी नाही

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील म्हसावद गावातून जाणारा महामार्गावरून राजस्थान येथील ट्रक खड्ड्यात येवून पडल्याची घटना रविवारी २ ऑक्टोबर रेाजी सकाळी ७ वाजता घडली. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.

याबाबत अधिक असे की, एरंडोल ते नेरी दरम्यान जाणारा महामार्ग हा जळगाव तालुक्यातील म्हसावद गावातून जातो. रविवारी २ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास राजस्थान येथील लाकडांनी भरलेला ट्रक गावातून जात असतांना गावातील गणपती मंदीरासमोरील खड्ड्यात येवून पडल्याने ट्रक पलटी झाला. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, सकाळी घटना असल्याने गावात वर्दळ नसल्याने मोठी हानी टळली. अवजड वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी येथील नागरीकांनी केली आहे.

Exit mobile version